Uncategorized
कोलंबी मार्ग मुखेड ते नांदेड विना-वाहक विना-थांबा बससेवेस प्रारंभ

मुखेड:- २८ जुलै २५
मुखेड येथून दीड तासांत नांदेडला जाण्यासाठी एसटीच्या मुखेड आगार विभागाने विना–वाहक विना–थांबा बससेवा सुरू केली आहे. नांदेडला जाण्यासाठी प्रवाशांना दररोज तीन बसेस ९ फेरी विना थांबा आणि विना वाहक बससेवा सुरू झाली असून, ही बससेवा मुखेड कोलंबी नांदेड अशी जाणार आहे. प्रवास भाडे १२२ रुपये असून, या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी केले आहे. मुखेड आगारातून १६ जुलैपासून दररोज सकाळी ६:४५, ७:१५ व ७:४५ यावेळेत तीन बसेस विना थांबा आणि विना वाहक जात आहेत. या तिन्ही बसेस प्रत्येकी तीन म्हणजे एकूण ९ फेऱ्या करीत असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक अक्षय वाघमारे यांनी दिली आहे.



