जि.प.मुलींचे हायस्कूलमध्ये स्काऊट-गाईडचे तालुकास्तरिय उजळणी वर्ग संपन्न.

मुखेड / प्रतिनिधी.२७.जुलै २५
भारत स्काऊट-गाईड नांदेड द्वारा आयोजित तालुकास्तरीय उजळणी वर्ग कार्यशाळा मुखेड शहरातील पिएमश्री,आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या शाळेमध्ये दिनांक २५ जुलै रोजी संपन्न झाले आहे.
तालुकास्तरिय उजळणी वर्ग कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुलींचे हायस्कूलचे सांस्कृतिक विभागप्रमुख तथा प्रभारी मुख्याध्यापक दिलीपराव देवकांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, प्रमुख मार्गदर्शक स्काऊट-गाईडचे जिल्हा संघटक जनार्दन इरले,श्रीमती माधुरी जवणे जिल्हा संघटक गाईड नांदेड, एसडब्ल्यूबी प्रशिक्षण समुपदेशन हेमंत भेंडे,वनिता ससाने यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुकास्तरीय उजळणी वर्ग कार्यशाळेची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष , प्रमुख पाहुणे,मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये स्काऊट प्रार्थना घेण्यात आली.कार्यशाळेचे प्रास्ताविक जनार्दन इरले यांनी केली.प्रास्ताविकेमध्ये त्यांनी स्काऊट गाईडचा इतिहास व नांदेड स्काऊट गाईड चळवळ कशा पद्धतीने काम करते हे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच हेमंत भेंडे यांनी स्काऊट आणि गाईड याबद्दल माहिती सांगितली व शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. श्रीमती माधुरी जवणे (जिल्हा संघटक गाईड) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी या कार्यशाळेत बद्दल आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन तालुक्यातील प्रत्येक शाळेने यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे मनोगतामध्ये म्हटले.या कार्य शाळेसाठी तालुक्यातील विविध शाळेतील स्काऊट आणि गाईड मास्टर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संगणक कक्ष विभाग प्रमुख व्यंकटी केंद्रे यांनी केले तर आभार क्रिडा विभागप्रमुख देशमुख ए.डी. यांनी मानले.कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



