Uncategorized

पिंपळगावजवळील लॉजमध्ये कंधारच्या शिक्षकाचा मृतदेह आढळला

  • आत्महत्या की हत्या? – याचा तपास अर्धापूर पोलीस करत आहेत.

  ऑगस्ट २०२५ | अर्धापूर (नांदेड)

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात खाजगी संस्थेवर कार्यरत शिक्षकाचा अर्धापूर तालुक्यातीलपिंपळगाव महादेव पाटीजवळ एका लॉजमध्ये आज सकाळी ११ वाजता मृतदेह आढळून आल्याने एकचखळबळ उडाली आहेआशिष भाऊसाहेब शिंदे (रागुंटूर ताकंधारअसे मृत शिक्षकाचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिंदे हे कंधार तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होतेशनिवारी सकाळी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित खोलीचा दरवाजा बराच वेळ  उघडल्याचे लक्षात येताच त्यांनी अर्धापूर पोलिसांना याची माहिती दिलीपोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडून पाहणी केली असताशिंदेमृतावस्थेत आढळून आले.

पोलिस निरीक्षक संजय कदमभानुदास राठोडरामेश्वर गुळेदवार आणि अरुण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपास केलामृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असूनशवविच्छेदना नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहेशिंदे हे नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होतेत्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातआहे.

दरम्यानत्यांनी आत्महत्या केली की हत्यात्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालात्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण कायशिंदे लॉजवर नेमकं कोणत्या कारणासाठी गेले होतेयाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button