तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर अटक होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर

नागपूर:- दि ०२ ऑगस्ट २५
महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांकडून टीका होत असतानाच, राजठाकरेंनीही पनवेलमधील शेकाप मेळाव्यात सरकारला आव्हान दिलं. एकदा अटक करून दाखवाच, असंते म्हणाले होते. त्यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.राज्य सरकारनं विधानसभा अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणलं. या विधेयकावरून विरोधकांकडूनटीका होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पनवेलमध्ये बोलताना सरकारवर टीका केली. राज्यसरकारने अर्बन नक्षल कायदा आणला असून, कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हालाअटक करू शकतं. एकदा अटक करू देच, असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. त्याला आता मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले फडणवीस? हा कायदा त्यांच्यासाठी केलाच नाही. पण तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागत नाहीत, तर तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असं फडणवीसम्हणाले. जे लोक कायद्याच्या विरोधात जातील, त्यांच्याकरिता तो कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात कायदानाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं जे कमेंट्स आहेत, ते कायदान वाचता केलेल्या कमेंट्स आहेत, असंही उत्तर त्यांनी राज ठाकरेंना दिलं.



