Uncategorized
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

नांदेड प्रतिनिधी:- ०६ ऑगस्ट २५
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुधवरी 6 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथुन विमानाने दुपारी 1.20 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वा. माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांचे निवासस्थान साई निवास महात्मा फुले हायस्कुलजवळ यशवंत कॉलेजरोड बाबानगर नांदेड येथे आगमन. दुपारी 1.30 वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका कै. सौ. स्नेहलता भास्करराव पाटील खतगावकर यांच्या दु:खद निधनानिमित्त सात्वंनपर भेट. त्यानंतर दुपारी 2.25 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 2.30 वा. हेलिकॉप्टरने बीडकडे प्रयाण करतील.


