क्राईम

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या मदतीने तरुणाचा खून

हदगाव :- ०५ जुलै २५

हदगाव तालुक्यातील ढोरळी या गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहेपत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या मित्राचा खून केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसारकैलास काटेकर या व्यक्तीला संशय होता की त्याच्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अनैतिक संबंध आहेतया रागातून त्याने काही मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीला दारूच्या नशेत ठार मारले.

हत्या केल्यानंतर मृतदेह गावाजवळ फेकण्यात आलापोलिसांनी तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असूनप्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहेआरोपीने पोलिसांसमोर सांगितले कीदारूच्या नशेत त्यांनी हा गुन्हा केला.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहेघटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस धागादोरा नसतानाहीवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने आणि साक्षीदारांच्या माहितीवरून केवळ १२ तासांच्या आत दोघा आरोपींना अटक केलीया जलद आणि अचूक कारवाईबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button