मुखेड कोर्टासमोर रस्त्यावरच चालतेय बेकायदेशीर दुचाकी दुकान; नरसी रोडवर अतिक्रमणाने नागरिक त्रस्त

मुखेड -(ता. प्रतिनिधी) ०९ ऑगस्ट २५
नरसी रोडवरील कोर्टासमोरील रस्त्यावर हिब्बटकर यांचे मोटारसायकल व पिचकारी दुरुस्तीचे दुकान बेकायदेशीरपणे रस्त्यावर थाटले गेले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या दुकानातून रस्त्यावरच मोटार सायकलींची दुरुस्ती आणि पिचकारी फवारणीचे काम केले जात असल्याने सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा त्रास होत असून, अपघाताचेही धोके वाढले आहेत.
विशेष म्हणजे सदर दुकानदार हे कोर्टा समोरच दुकान थाटून आवाजाने व फवारणीतून निर्माण होणाऱ्याध्वनी आणि रासायनिक प्रदूषणामुळे आजूबाजूच्या शासकीय कार्यालये, इंग्रजी माध्यमाची शाळा आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“प्रशासनाने तातडीने पाहणी करून अतिक्रमण हटवावे“, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



