Uncategorized

मुखेड: युवकाचा संशयास्पद मृत्यू 

मुखेड प्रतिनिधी:-  १२ ऑगस्ट २५

मुखेड शहरा जवळील तांदळी येथील रहिवाशी बाबाराव बालाजी मेथे युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि १२ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक बाबाराव बालाजी मेथे वय २७ हा तेलंगणातील अरमूर येथे रोजगाराचे काम करण्यास गेलेला होता तो काल आपल्या गावी तांदळी येथे येऊन त्याच्या छोट्या मुलीला कावीळ झाल्याने शिवणखेड येथे औषध उपचार करण्यासाठी नेऊन परत आपल्या गावी आले  सोमवारी आठवडी बाजाराचा भाजीपाला अनण्यासाठी मुखेड येथे आले पण ते घरी परतल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शोधा शोध सुरू केली परंतु रात्रभर मिळून आले नाही आज सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू केली असता शहरातील बारहाळी रोड फिल्टर पाण्याची टाकी जवळील उमरदरी शिवारात मोटरसायकल दिसून आल्याने तेथे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता त्याचे प्रेत दिसून आले त्यांनी पोलिसांना सदरील माहिती दिली असता पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे त्यांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले

ही माहिती समजताच देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी हजर होऊन तपासा बदल मार्गदर्शन केले तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले  मयतास शवविच्छेदनासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात अन्यात आले मयतास पत्नी तीन मुलं आई वडील असे परिवार आहे रात्री मुखेड पोलिस ठाणे येथे गुन्हा नोदविण्याची प्रक्रिया सुरु होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button