हिमायतनगर शहरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्त

◽️पोलिस प्रशासन या डीजेवाल्यावर कार्यवाही करणार कधी?
हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी
सर्वोच्च न्यायालयाने दिवसा व रात्रीच्या वेळी डीजे आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही हिमायतनगर शहरात शासकीय नियम पायदळी तुडवून डीजे कर्णकर्कश आवाज वाढवून वाजवले जातात. या ध्वनिप्रदूषणाचा ज्येष्ठ नागरिकांसह हृदय रुग्ण,लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. मात्र, याकडे हिमायतनगर पोलीस प्रशासनाने ‘हाताची घडी तोंडावर बोट‘ ठेवून बघ्याची भूमिका स्वीकारल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या भूमिकेमुळे डीजेवाल्यांचे चांगलेच फावले आहे
शहरात लग्न असो,की, कुणाचा बर्थडे असो, अथवा इतर कहीही कार्यक्रम असो, शहरात कोणीही आपल्या मन मर्जी प्रमाणे डिजे लावत असल्यामुळे रुग्णांना,लहान मुलांना या आवाजाचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे
पोलीस प्रशासनाने या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्ती करावी डीजेच्या आवाजामुळे मुळे एखाद्याची जिवित हाणी होण्याची शक्यता आहे
अशा मोठ्या कर्णकर्कश आवाजात डीजे वाजणाऱ्या डीजे वाल्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी हिमायतनगर शहरातील नागरिक करत आहे


