सामाजिक
होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक नारायण विठोबा पाटील लुटे यांचे निधन

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १४ मे २६
होकर्णा नगरीचे ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदायातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व कै. नारायण विठोबा पा. लुटे यांचे दुःखद निधन झाले आहे. ते वारकरी संप्रदायातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते, तसेच ‘लक्ष्मण शक्ती’ या कथेचे ते प्रभावी कथाकार होते.
ते शिवसेना जिल्हा किसान प्रमुख, तंटामुक्त अध्यक्ष तथा उपसरपंच श्री शंकर पाटील लुटे (होकर्णकर) यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने होकर्णा परिसरात आणि वारकरी संप्रदायात मोठी शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कै. नारायण विठोबा पाटील लुटे यांच्या पार्थिवावर शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता होकर्णा (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात लुटे पाटील परिवार आणि मोठा आप्तस्वकीय वर्ग आहे.



