Uncategorized

राम तरटे यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर


नांदेड : दैनिक उद्याच्या मराठवाड्याचे उपसंपादक तथा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार 2023 साठी निवड करण्यात आली आहे.
भारतातील पहिले पत्रकार मित्र संघटन असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलच्या वतीने मागील 18 वर्षापासून राज्यातील विविध पत्रकारांचा राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीची अठरावे राज्यस्तरीय सम्मेलन नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृह येथे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पार पडणार आहे. या संमेलनात राज्यातील उत्कृष्ट पत्रकारांना गौरविण्यात येणार आहे .या पुरस्कारासाठी पत्रकार राम तरटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस् सर्कलचे कार्यवाह बाळकृष्ण कासार , अध्यक्ष गणेश कोळी , जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे यांनी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button