राजकीय

मुखेड मतदारसंघात आमदार तुषार राठोड यांची ‘हॅट्रिक’ लाडकी बहीण ठरली वरदान

मुखेड : नुकत्याच पार पडलेल्या ९१ मुखेड विधानसभा निवडणुकीत भाजपा– शिवसेना महायुतीचे उमेदवारडॉतुषार गोविंदराव राठोड यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार हनमंतराव पाटीलबेटमोगरेकर यांचा तब्बल चाळीस हजार मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली तर दुसरीकडे माजीहाणमंत बेटमोगरेकर यांना सलग तीन वेळेस पराभव पत्कारावा लागला आहेअपक्ष उमेदवार बालाजीखतगावकर हे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होतेअनेकांनी पैजा लावल्या होत्यामात्रमतदारांनी पुन्हाएकदा आमदार राठोड यांच्यावर विश्वास टाकून त्यांना विधानसभेत पाठविलेमुखेड विधानसभा – निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी – ७० टक्के मतदान झालेत्यामुळे वाढीव मतदानाचा कोणाला कौल – मिळणार याची उत्सुकता वाढली होती२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू – असताना भाजपचे डॉतुषारराठोड हे सुरुवातीपासून आघाडीवर राहिले. – राठोड यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त – करून मुखेडविधानसभेवर भाजपचा झेंडा फडकाविला आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपचे उमेदवार दिवंगत गोविंदराव राठोड हे निवडून आलेहोतेपणशपथविधी सोहळ्याला जाताना रेल्वे प्रवासात त्यांचे निधन झाल्यानंतर २०१५ च्यापोटनिवडणुकीत डॉतुषार राठोड विजयी झाले होतेयानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदाराठोड विजयी झाले.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपकडून डॉतुषार राठोड काँग्रेसकडून माजी हणमंत पाटील बेटमोगरेकर अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांच्यात तिरंग लढत झालीएकंदरीत मुखेड विधानसभानिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुखेड येथील प्रचारसभेत डॉतुषार राठोड यांना अधिकमताधिक्याने निवडून द्यावेमी त्यांना मंत्री करते असे जाहीर आश्वासन दिले होते यामुळे सुद्धा मतदानाचीटक्केवारी वाढून जवळपास ३८ हजारांच्य मताधिक्याने जनतेने त्यांना निवडून दिले आहेआता फडणवीसराठोड यांचा आपल्या मंत्रीमंडळात समावेश करतात काययाकडे बंजारा समाजासह जिल्ह्यातीलमतदारांच्य नजरा लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button