भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी मुख्यमंत्री करायला हवे
ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांची मागणी
मुखेड प्रतिनिधी:-
भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचे भाजपा व महायुतीचे स्पष्ट बहुमत आलेले असताना मुख्यमंत्रीओबीसींचा करून फडणवीसांनी वक्तव्य सिद्ध करावे अशी मागणी ओबीसी नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांनीकेली आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस नेहमीच भाजपाचा डीएनए ओबीसींचा असल्याचे वक्तव्य करत असतात. महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीत कधी नव्हे ते भाजपा प्रणित महायुतीचे राक्षसी बहुमत मिळाले आहे शिवाय महायुतीत अनेकओबीसी आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. अशावेळी फडणवीस यांनी आपले वक्तव्य सिद्धकरण्यासाठी ओबीसी नेतृत्व पुढे आणून मुख्यमंत्रीपद बहाल करावे. अन्यथा फडणवीसांनी ते वक्तव्य केवळमराठा समाजाविरुद्ध ओबीसी समाजाला भडकावून त्यांना भाजपाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हणून त्यांनाभाजपाकडे वळवण्यासाठी केल्याचे सिद्ध होईल. भाजपा आणि फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा अशाप्रकार चा एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला आहे अशा वेळेस भाजपाचा डीएनए ओबीसीचा असल्याचेसिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्रीपद ओबीसी नेतृत्वाला देण्यात यावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ओबीसीनेते व ओबीसी जनगणना परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी केले आहे.