एसटी व दुचाकीचा अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर

मागील आठ दिवसातला हा तिसरा अपघात तर चौथा मृत्यू
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील चांडोळा तांडा जवळ एसटी व दुचाकीचा दि. ३ फेब्रुवारी रोजी अंदाजे सांयकाळी ५ च्यादरम्यान अपघात होऊन बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील ईटग्याळ पदे येथील मारोती रमेश सूर्यवंशी वय ३८ व अश्विनी रमेश सूर्यवंशी वय ३२ हे दोघेभाऊ बहीण दुचाकी क्रमांक एम एच २६ बी डब्ल्यू ९२५२ ने ईटग्याळ पदे वरून चांडोळा मार्गे नांदेड ला जात असताना मुखेड – चोंडी – देगलूर ही बस चांडोळा मार्ग देगलूर ला जात असताना चांडोळा तांडा जवळसमोरासमोर धडक होऊन बहीण अश्विनी रमेश सूर्यवंशी (वय ३२) हिचा जागीच मृत्यू झाला तर भाऊमारोती सूर्यवंशी ( वय ३८) याच्या पायाला व उजव्या हाताला फॅक्चर झाल्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयातडॉ. बालाजी गरूडकर यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले.
सदर घटना कळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश हासुळे यांनी घटनेचा पंचनामा केला. मयतास शवविच्छेदनासाठी मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांना ही घटना कळताच उपजिल्हारुग्णालयाकडे धाव घेत एकच हंबरडा फोडला होता.



