Uncategorized

होटाळा येथे दुचाकी व  चारचाकीचा भीषण अपघात तरुणाचा जागीच मृत्यू 

मुखेड प्रतिनिधी:- ११ सप्टेंबर

मुखेडहून देगलूर येथे जात असताना समोरुन जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर आदळल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना होटाळा येथे अंदाजे संध्या ७ वाजताच्या दरम्यान घडली.

राजू सुरेश निरदुडे  (२५) रा. फुलेनगर तालुका मुखेड असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचा नाव आहे. तर दुसरा रवी चंद्रकांत निरदुडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे रस्त्यावरील गतिरोधक चुकविताना हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

फुलेनगर येथील राजू सुरेश निरदुडे  व रवी चंद्रकांत निरदुडे हे दोघे जण मुखेडहून नायगांवला आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या पल्सर दुचाकीने संध्या ७ वाजता निघाले होते . दरम्यान होटाळा गावाकडून जाणारी एका चारचाकीला दुचाकीची समोरा समोर धडक लागली गाडी कंट्रोल नझाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामूळे दुचाकी गाडी गतिरोधक वरून चार चाकी गाडीवर आदळल्याने या धडकेत दुचाकीवर राजू सुरेश निरदुडे  हा रस्त्यावर पडल्याने डोक्यावर मार लागून जागीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातात मृत राजू सुरेश निरदुडे याच्या वडिलांचा आधार असलेल्या मुलाच्या अपघाती मृत्यूने वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button