तांदळाच्या ६२० गोण्या घेऊन जाणारा ट्रक फुलवळ टोलनाक्याजवळ उलटला

▫️माल हा काळ्याबाजारात चालला होता की काय?
कंधार प्रतिनिधी:- १३ सप्टेंबर
नांदेड–बिदर राष्ट्रीय महामार्गावरील फुलवळ टोलनाक्याजवळ (ता कंधार ) रस्त्यावर तांदूळ घेऊनजाणारा ट्रक उलटला. ही घटना शुक्रवारी(दि.१२) सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. टोलनाक्याजवळ पलटी होऊन तांदळाचे भरलेले पोते अस्ताव्यस्त पडल्यामुळे सदरचा माल हा काळ्याबाजारात चालला होता की काय ? असा प्रश्न उपस्थित करून परिसरात चर्चेला उधान आल्याचेऐकावयास मिळत होते.

याबाबतची अधिक माहिती अशी की ट्रक क्रमांक पी.बी.०४/ एएफ–८४४८ हा पंजाब पासिंग चा ट्रकअसून अंदाजे प्रति पोते ५० किलो याप्रमाणे ६२० तांदळाने भरलेले पोत्यासहीत पलटी झाला. ही बाबलक्षात येताच फुलवळ, बहाद्दरपुरा, कंधार येथे पसरताच तात्काळ या ठिकाणी शेकडो नागरिकांची बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
ट्रक पलटी होताच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तींनी ट्रक चालकास केबिनच्या बाहेर काढून काही दुखापत झाली का? अशी विचारणा करत चालकाचे नाव विचारले असता रामेश्वर उर्फ परमेश्वरकाशिनाथ जाहीर रा. लिंबोटी ता. लोहा जि. नांदेड येथील रहिवासी असून सदरचा तांदूळ हा बिदर येथून भरून गोंदियाकडे जात असल्याचे सांगत असताना तिथे मोठा बघ्यांचा जमाव झाल्याचे पाहून पुढील माहिती न देता त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच कंधार तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक विनोद पावडे, पोलीसनिरीक्षक चंद्रकांत जाधव, मंडळ अधिकारी शेख, ग्राम महसूल अधिकारी केंद्रे यांनी घटनास्थळी तात्काळहजेरी लावली. उपस्थित महसूल विभाग व पोलीस अधिकारी यांना घटनेची माहिती विचारली असता, याठिकाणी चालक किंवा मालक उपस्थित नसल्यामुळे त्यांचा शोध घेऊन गाडीत असलेल्या मालाचीरीतसर पावती आहे का ? माल कुठून कुठे चालला होता, याची अद्याप माहिती आम्हाला मिळाली नसून सदर माल लॅब तपासणी कडे पाठविण्यात आले असून माहिती मिळताच माहितीच्या आधारे दोषीव्यक्तीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे पुरवठा निरीक्षक पावडे यांनी सांगितले



