Uncategorized

मंदिरात का गेला म्हणत मारहाण ; सहा जणांविरुध्द अट्रॉसिटीसह विविध गुन्हा दाखल

उमरी प्रतिनिधी १३ सप्टेंबर 
मंदिरात दर्शनासाठी का गेलास म्हणत एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उमरी तालुक्यातील मौजे शिरुर येथे घडली आहेया प्रकरणी सहा जणांविरुध्द उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे शिरुर येथील रहिवासी तथा मिस्त्री प्रकाश माधव टिकेकर ४३ हे  त्यांची मुलगी आसे गावातील मारुती मंदिरात दि सप्टेंबर रोजी दर्शनासाठी गेले होतेमंदिरात दर्शन घेवून ते खाली उतरत असताना शिरुर मधील बाळू लक्ष्मण मामंडे याने त्यांचा हात धरुन जातीवाचक शिविगाळ करीत तू आमच्या मंदिरात कसे काय गेलास म्हणत खाली ओढत आणले आणि बाळू  त्याचे सहकारी गोविंद पिराजी मामंडेविठ्ठल महाजन दाताळकरमाधव किशन खतगावेसाईनाथ बापुराव जाधव  अन्य एक अशासहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केलीआपण हिंदू मांतग आहेत ते माहित असूनही आरोपींनी जातीवाचक शिविगाळ करीत लाथा बुक्क्या घातल्यात्यामुळे आपण पळून गेलो  जीव वाचविलाअशी फिर्याद टिकेकर यांनी दिलीत्यावरुन पोलिसांनी उमरी पोलिस ठाण्यात उपरोक्त सहा आरोपीं विरुध्ददि११ सप्टेंबर रोजी गुरनं २९२/२५अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहेयाप्रकरणाचा तपास धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button