Uncategorized

पत्रकार विजय बनसोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

मुखेड प्रतिनिधी:- दि १८ सप्टेंबर
मुखेड:
 मुखेड येथील धडाडीचे पत्रकार विजय इरबा बनसोडे(वय ४२यांचे आज दि १८ सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेत्यांच्या मागे आई, वडील  दोन मुले ,भाऊ असा परिवारआहे.

त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार सायंकाळी ०५ वाजता मोतीनदी स्मशानभूमीकौठा रोड मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजय यांना आज सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होतेत्यानंतर त्रास वाढल्यामुळे त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलात्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त सर्वत्र पसरले आणि पत्रकारिता क्षेत्रावरशोककळा पसरलीत्यांच्या अकाली निधनाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला.

विजय हे मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे ता उपाध्यक्ष होते त्यांनी दैनिक दलितवाणी व दैनिक श्रमिक एकजूट साठी लिखाण करत होते.

निर्भिड पत्रकारिता क्षेत्रातील दांडगा अनुभव बातमीचा अचूक स्रोत म्हणून विजय यांची ओळख होती.

विजय यांच्या निधनावर श्रमिक एकता न्यूज परिवार पत्रकार संघ,सामाजिक व राजकीय सर्व स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button