निष्ठेने काम करणाऱ्या आशा सेविकांचे मानधन रखडले

▫️सरकारची टाळाटाळ; सणासुदीच्या दिवसात आली उपासमारीची वेळ
मुखेड प्रतिनिधी:- ०१ ऑक्टोबर
तालुक्यात जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशा सेविकांचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे
तीन मिहन्यापासून मानधन रखडल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दसरा विदवाळीसारखे सण दारात उभे असताना या सेविका चिंतेत असून घरखर्च, मुलांचे शैक्षिणक साहित्य,शाळेची फी भरणे यासह दैनंदिदन गरजाही भागवणे कठीण झाले आहे.
आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे मासिक आव्हालावर आधारीत मोबदला देखल रखडला आहे. शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर दिले जाते, मात्र गावागावात आरोग्य सेवेचे काम करणाऱ्याा आशा सेविकांकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करते, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज घराघरांत जाऊन विविध आरोग्य योजना व सेवांची माहिती नागिरकांपर्यंत पोहोचिवण्याचे काम या सेविका का करतात. गरोदर व स्तनदा माता, क्षयरोग, कर्करोग, रक्तदाब, पोलिओ, कोरोना, हत्तीरोग,सिकलसेल अशा गंभीर आजारांबाबत जनजागृती करणे, लसीकरण, तपासणीसाठी रुग्णांना पाठिवणे, सोनोग्राफी, नसबंदी शस्त्रिक्रया यासाठी मार्गदर्शन करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसेच आयुष्मान भारत कार्ड आभा कार्ड वितरण , किशोरवयीन मलींसाठी सभा क्षयरोग औषध पुरवठा यासह ग्रामपंचायतींच्या काही कामांतही त्या सक्रीय सहभागी असतात. इतके कष्टाचे काम करूनही मानधन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शासनाकडून दिवाळी बोनस किव्हा इतर सुविधा नाहीत. यामुळे सेविकांना रोजीरोटी आणि सण कसा साजरा करायचा, याची चिंता सतावत आहे. आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्याा आशा सेविकांना तातडीने मानधन दिले नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.



