Uncategorized

मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांड्याजवळ एका इसमाचा खून


मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील दगडे शिरूर शिवारातील हरिचंद्र तांडाजवळ वन विभागाच्या जागेतील एक दरीत शहरातील फुलेनगर येथे राहणाऱ्या अशोक ईश्वर चावरे
यांचा मृत्यूदेह दि.१० ऑक्टोंबर रोजी आढळून आला असून सदरील व्यक्तीचा खुन करून फेकला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यात असणारे अशोक ईश्वर चावरे वय ३५ वर्षे हा घर बांधकामातील सेंट्रींग कामाचे ठेकेदार होते ते दि. ८ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी घरून कामावर जातो म्हणून आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच २६ बी टी २५७१ या मोटरसायकल ने गेले सायंकाळी पाच वाजता नातेवाईकांनी त्यांना फोनवरून संपर्क साधला असता मी घराकडे येत आहे असे बोलणे पण झाले त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत त्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता नातेवायकानी पुन्हा फोन केले असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.
दरम्यान नातेवाईकांनी याचा शोध घेत असताना राज्य रस्ता क्रमांक २२५ लातूर मुखेड हायवे पासून पाचशे मीटर अंतरावर मोटरसायकल थांबलेली निदर्शनात आले तेव्हा या परिसरात शोध घेत असताना वन विभागाच्या जागेतील दरीत रक्ताने बंबाळ झालेले मृत अवस्थेत मृत्यूदेह निदर्शनात आला ही माहिती पोलीस स्टेशनला मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, पोना. राठोड, पोकॉ. प्रदीप शिंदे व पोलीस पाटील माधव टाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व वरिष्ठांच्या आदेशाने डॉग स्काॅड व फिंगर एक्सपोर्ट यांना पाचारण केले असल्याची माहिती मिळाली असून अशोक ईश्वर चावरे हा सेंट्रींग बांधकामाचा ठेकेदार असल्याने त्यांचे कोणासोबतही वैर नसतानाही त्यांचा खून का झाला असावा असा प्रश्न उपस्थित नागरिकांना पडत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button