Uncategorized

मुखेड नगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच उमेदवाराचा महापूर

मुखेड /प्रतिनिधी २२ ऑक्टोबर

मुखेड नगर पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अनेक उमेदवारीचा महापूर आला असून नैसर्गिक महापूरा नंतर हे आलेले दुसरे महापूर असल्याचे बोलले जात आहेया वेळी हौशे नौशे आणि गौशे मळवट भरून तयार असले तरी फिक्स नगर सेवकांची प्रजाती मात्र वाढल्याचे स्पष्ट पहावायास मिळत आहेनिवडणूकिची अधिकृत घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असूनसोशल मीडियावर उमेदवारी जाहीर करण्याची अक्षरशः झुंबड उडाली असल्याचे पाहावायास मिळत आहे.

आपल्या ऐपती (बुद्धीप्रमाणे सोशल मिडीयचा उपयोग होतं असून अशे कांही उमेदवार आहेत की आपल्या मोबाईल वर सोशल मीडियावर मॅसेजची देवान घेवान जमत नाही म्हणून ते आज कालच्यानवीन पिढीतील मुलांची मदत घेत बॅनर आणि ‘लवकरच भेटू‘ अशा संदेश पाठवून मतदारा पर्यंतपोहचण्याचा प्रयत्न करत आहेतकाहींनी थेट “फिक्स नगरसेवक,फिक्स पुढचा नगराध्यक्ष” असा नारादेत मोहीम सुरू केली आहेत्यामुळे सोशल मीडियावर मुखेड नगर परिषदेची निवडणूक सुरू झाल्याचेचित्र मात्र स्पष्ट दिसत आहेया वेळी मुखेड नपा .चे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीवठरल्याने अनेक पुरुष नेत्यांचे गणित बिघडले आहेतर महिला कार्यकर्त्यांमध्ये नव्या ऊर्जेची लाटउसळली आहेप्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या महिला उमेदवारांचा शोध सुरू केला असूनस्थानिकपातळीवर गट– तटांची हालचाल वेगाने सुरू आहे.  नगरपरिषदच्या निवडणुका २०१६ साली झाल्याहोत्या नगर परिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ या वर्षी संपला गेल्या चार वर्षा पासून लोकशाहीसंपूष्टात येऊन येथे नौकरशाही सुरु आहे

चार वर्षात नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरि कांना बऱ्याच अडचणीस तोंड द्यावे लागलेआपले गाहाने मांडण्यासाठी हक्काचा माणूस नसल्यामुळे जनतेची हेळसांड झाल्याचे पाहावायासमिळालेअशा पार्श्वभू मीवर निवडणूक प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण जागाझाला आहे.

आरक्षणाचा तक्ता जाहीर होताच सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केलीकाहींनी स्वतःच्या कार्याचा आढावा देणारे फोटो पोस्ट केलेतर काहींनी ‘सेवेसाठी सज्ज‘ असा टॅगलाईनदिलाकाही संभाव्य उमेदवारांनी थेट “जनतेचा आशीर्वाद मागतो” अशा घोषणां मुळे सोशल मीडियावरचर्चेचा विषय बनला आहेसोशल मीडिया वर प्रचाराचा महापूर असलातरी मतदारांनी केवळ पोस्टपाहून निर्णय  घेता उमेदवारांची खरी कामगिरी तपासावीअशी सुजाण नागरिकांची प्रतिक्रिया आहेप्रशासक राज असताना नागरी प्रश्नांसाठी कोण पुढे सरसावलेकुणी लोकांच्या अडचणी प्रशासनापर्यंतपोहोचवल्या याचाही विचार मतदारांनी करावाअसा सल्ला दिला जात आहेमुखेड शहराला आज खऱ्याअर्थाने प्रामाणिककार्यक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहेपक्षीय हितापेक्षा शहराचाविकासपारदर्शक प्रशा सन आणि लोकसेवा यांना प्राधान्य देणारा उमेदवारच मुखेडचा विकास साधूशकतोजास्तीत जास्त उमेदवार लोकसेवेच्या हेतूने पुढे येत असतीलतर हे लोक शाहीचे सकारात्मकलक्षण आहेविकास हेतू मनात ठेवून हे उमेदवार धडपड करत आहेत की मलाई खावून मालदार होण्यासाठीची हि तळमळ बाळगून आहेत हे ओळखण्याची जबाबदारी मतदारांवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button