प्रेमसंबंधातून- मुखेड तालुक्यातील तरुणाचा मृत्यू – कर्नाटकमध्ये अमानुषपणे मारहाण

मुखेड प्रतिनिधी:- २६ ऑक्टोबर
मुखेड तालुक्यातील गोणेगावचा २१ वर्षीय विष्णूकांत पांचाळ या तरुणाचा प्रेमसंबंधातून जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माहितीनुसार मुखेड तालुक्यातील गोणेगांव येथील विष्णुकांत जयराम पांचाळ याचा दि.२१ ऑक्टोबर मंगळवार रोजी कर्नाटकातील औराद जि.बिदर जवळील नागमपल्ली येथे सदरील गावातील गजानन वअशोक व इतर साथीदारांनी संगमत करून बेदम मारहाण केली. दरम्यान दि. २२ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळ च्या सुमारास युवकाचा उपचारा दरम्यान हैद्राबाद येथे मृत्यू झाला.
दि.२४ ऑक्टोंबर शुक्रवारी दुपारी या युवकाचा अंत्यविधी गोणेगांव येथे करण्यात आले.
अधिकची माहिती अशी की , गाणेगाव तालुका मुखेड येथील रहिवाशी युवकाचे कर्नाटक येथील विवाहित महिलेशी मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध जुळले होते. सदरील प्रेम संबंध महिलेच्या नातेवाईकांच्या डोळ्यात खटकत होते. याचा वचपा काढण्यासाठी महिलेच्या नातेवाईकांनी या विष्णू पांचाळ मुलालाफोन करून नागमपल्ली येथे बोलून घेतले. त्यावेळी विष्णू सोबत त्याचे दोन मित्रही होते तेथील मंदिरात गेल्यानंतर मंदिरातून बाहेर येतात विष्णूला महिलेच्या नातेवाईकांनी पकडून नेले व मारहाण करण्यास सुरुवात केली हे पाहून विष्णूचे दोन्ही मित्र तेथून पळून निघून आले.
विष्णू पांचाळ याचे हात पाय बांधून दोन जणांनी काठ्याने अमानुषपणे मारहाण केली व इतर जणांनी याप्रकरणी मदत केली.सदरील मारहाण करत असताना तेथील गावातील लोकांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली कोणीही समोर येऊन सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आमनुष पणे त्याला मारहाण करून सदरील युवकावर अत्याचार करण्यात आले आहे. या प्रकारणी दोघांवार गुन्हा दाखल झाला असुनइतर सात ते आठ आरोपी मोकाट असल्याचा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सदरील प्रकरणाचा गुन्हा चिंताकी (ता. औराद) येथे नोंद करण्यात आला आहे.
दिवाळी सणानिमित्त विष्णू पांचाळ हा गोणेगांव येथे गावी आला होता. मंगळवारी विष्णू यालानागमपल्ली येथून फोन आल्याने तेथे गेला. सदरील आरोपीची आणि विष्णुची एक दिड वर्षांपासून चीओळख होती. नागमपल्ली येथील एका महिलेशी त्याचे प्रेम संबंध होते. याच गावातील हनुमान मंदिर येथे पूजा करून येत असताना सदर आरोपिंनी विष्णुला मारहाण केली आणि गावात हात पाय बांधून अंगावरचटके दिले. विष्णू ला त्याच्या संपूर्ण अंगावर दुःखापत झाली होती. बिदर हुन हैद्राबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला. आई व मुलगा काम करण्यासाठी हैद्राबाद येथे गेल्या अनेक वर्षा पासून राहत होते. विष्णुच्या वडिलांचा मृत्यू तीन चार वर्षांपूर्वी झाला होता घरातआईला व आजीला मदत करत आणि मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदार निर्वाह हाच करायचा, कुटूंबातील कर्त्या मुलाचा घात झाल्याने आईचे मानसिक दृष्टीने खाचिकरण झाले.
“माझ्या मुलाला मारणाऱ्या सर्व आरोपिंना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी आर्त हाक विष्णूच्या आईकडून ऐकायला मिळत आहे. या प्रकारणी दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असुन इतर सात तेआठ आरोपी मोकाट आहेत. आरोपीवर ‘कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा‘ लागू करावी अशीमागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा चिंताकी ता.औराद पोलीस अधिक तपास करत आहेत.



