लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार

▫️चौकशी करण्याची सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांची मागणी
लोहा / प्रतिनिधी ०५ जुलै २५
लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असूनया थातुरमातुर निकृष्ट व बोगस दर्जाच्या कामाची शासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईकरावी अशी मागणी सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी लोहा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केली आहे.
पुढे बोलताना सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे म्हणाले की, लोहा व कंधार तालुक्यातील ८२ गावात जिल्हा परिषदेच्या जनजीवन मशिन अंतर्गत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कोट्यवधी रुपयांची मंजूर झाले आहेत त्या कामांचे टेंडर निघून गुतेदाराला वर्क ऑर्डर दिली आहेत. गुतेदारांनी कामेन करता या कामाचे बीले उचलली आहेत पण एक ही काम पुर्ण झाले नाही. नळाच्या थुट्याला पाणीआले नाही मागे लोहा येथील के. के. मंगल कार्यालयात आमदारांच्या उपस्थित पाणी पुरवठ्याचीआढावा बैठक झाली होती. त्या बैठकीत सरपंचाच्या व नागरिकांच्या पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालीनाहीत अनेक गावात पाणी नाही गुत्तेदार व अभियंत्यांमध्ये मि लीभगत आहे. अशा तक्रारी आल्यानंतर आमदारांनी अभियंत्यांना धारेवर धरले होते कारवाई करण्याची तंबी दिली होती पण पुढे काहीच झालेनाही. पाणी कुठे मुरले कुणाला कळाले नाही. गुतेदारांनी व अभियंत्यांनी आम दारांना मॅनेज केले का? असा सवाल प्रा. मनोहर धोंडे यांनी केला व लोहा व कंधार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी शासनानी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सेवाजनशक्ती पार्टीचे पक्षप्रम ख प्रा मनोहर धोंडे यांनी केली आहे.



