शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र शेतमजूर युनियनचा पाठिंबा

मुखेड प्रतिनिधी:- ०१ नोव्हेंबर
नागपूर येथे सुरू असलेल्या, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व इतर २१ मागण्यांसाठीच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी दडपशाही करीत शेतमजूर–शेतकऱ्यांचे नेते कॉ. राजू हटवार व भीमराव गोंडाणे यांना दि.३० आक्टोबर रोजी पहाटे बेकायदा अटक करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ मुखेड तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांना महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीणमजूर युनियन (लाल बावटा) च्या जिल्हा जिल्हा समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. कर्जमुक्ती व इतर मागण्या मान्य केल्या नाही तर ग्रामीण भागात आंदोलन तीव्र करण्याचा इशा रा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनकत्यांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, नागपूर येथे विविधअखिल भारतीय किसान सभा तथा विविध शेतकरी संघटना कर्जमाफी व इतर मागण्यासाठी दोन दिवसापासून आंदोलन करीत आहेत. दि.३० आक्टोबर रोजी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतमजूर युनियनचे राज्य कमिटी सदस्य व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नागपूरजिल्हा सचिव कॉम्रेड राजू हटवार यांना गुरूवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी शेतमजुरांच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने ताब्यात घेणे हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे. एकीकडे गुंड गुन्हेगार मोक ाट सुटलेले असताना श्रमिक वर्गास आंदोलनातउतरवतील या भीतीपोटी कष्टकरी वगार्चे प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन श्रमिकांचा आवाज दडपता येणार नाही. या बेकायदा अटकेचा हृमहाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन(लाल बावटा) ह्व ची राज्य कमिटी तीव्र निषेध करत आहे. अटक झालेल्या ग्रामीण मजूर नेत्यांची तत्काळ सुटका करावी. त्याचबरोबर नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी व इतर प्रश्नांवरील आंदोलनाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल याचीगंभीर नोंद घ्यावी असा गंभीर इशारा महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) च्यापदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. मंजुश्री कबाडे, कॉ. अमीर कुरेशी यांच्या सह्या आहेत.



