Uncategorized

नांदेडमध्ये जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या;पावडेवाडी परिसरात खळबळ

नांदेड प्रतिनिधी:- ०३ नोव्हेंबर

 शहरालगतच्या पावडेवाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेजुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असूनपोलिसांनी दोन संशयित भावांना ताब्यात घेतले आहेया घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव रितेश पावडे असे असूनवर्षभरापूर्वी झालेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहेशनिवारी मध्यरात्री रितेश हा मित्रांसोबत जेवण करून घरी परतत असताना त्याचा काही व्यक्तींशी वाद झालाया वादादरम्यान धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहेगंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलेमात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरवउपविभागीय पोलिस अधिकारी व्यंजनेआणि पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी भेट दिलीमृत्यूपूर्वी रितेशने काही व्यक्तींची नावं सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहेत्यानुसार पोलिसांनी केशव पावडे आणि दिगंबर पावडेया दोघांना ताब्यात घेतले आहे.

या हत्येमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिस सुरू आहेत. दरम्यान, भाग्यनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने पावडेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button