Uncategorized

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर

मुंबई:- ०४ नोव्हेंबर 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीआहेमंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडलीया पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकी संदर्भात कोणतीही घोषणा करण्यातआलेली नाहीतर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायती संदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहेयावेळी निवडणुकीस पात्रअसलेल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेतया माध्यमातूनएकूण ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहेज्या २४६ नगर परिषदांमध्येनिवडणूक होणार आहेत्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहेतर दुसरीकडे ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहेयात १५ नवीन नगरपंचायतींचा समावेश आहेतर अजून १०५ नगरपंचायतीची मुदत संपलेली नाहीये.

राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहेतर  डिसेंबरला निकाल लागणार आहे. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेलत्यानंतर२५ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहेतर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहेअशीघोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहेयाला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहेदुबारतिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत.

निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळतेदुबार तिबार मतदारांबाबत कारवाईकरता येते.

क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोतप्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोतविधानसभेच्या मतदार यादीत नाव आहेपण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतोअसं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button