Uncategorized

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे

मुखेड प्रतिनिधी:- ०७ नोव्हेंबर 

नगर परिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून राजकीय पक्षांनीहीआदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन मुखेड नगरपरिषद निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी केले आहे.

मुखेड नगर परिषदेसाठी  डिसेंबर रोजी मतदान तर  डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहेनगर परिषदनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नगर परिषद क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव पुढे म्हणाले कीमुखेड नगरपरिषद मतदार यादीत ४२९ दुबार नावे असलेले मतदार असून त्यांना ओळखण्यासाठी दोन स्टार देण्यात आले आहेतअशा मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिलीनिवडणूक प्रक्रिया निपःक्ष  निर्भयपणे पार पाडण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रात १९ विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहेमुखेड नगरपरिषदे मध्ये एकूण दहा प्रभागात २५ हजार ६५६ मतदार असून यापैकी १२८११ पुरुष तर १२८४४ स्त्री मतदार आणि एक मतदार इतर म्हणून नोंदण्यात आला आहेनगरपरिषद क्षेत्रात मतदान करण्यासाठीएकूण २७ संभाव्य मतदान केंद्र असण्याची शक्यता आहेदहा प्रभागातून १ अध्यक्षासह २० लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहेतराखीव जागेसाठी उमेदवारांनी जात प्रमाणपत्र  प्रमाणपत्र वैधतापावती सोबत जोडणे आवश्यक आहेएका प्रभागात एका उमेदवाराला एकाच ठिकाणी उमेदवारी दाखलकरता येणार असून इतर प्रभागात तीन ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

सदर निवडणूक मतदान यंत्रावरच (ईव्हीएमघेण्यात येणार असून या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट यंत्रउपलब्ध असणार नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलीया निवडणुकीत अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांना  लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा आहे तर नगरसेवक पदासाठी खर्च मर्यादा  लाख ५० हजार रुपयाची असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिलीयावेळीसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शालिनी धुळेसतीश जोहरेनिवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेश जाधवसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार शालिनी धुळेसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश जोहरे.कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मणगिरी यांच्यासह कार्यालयीन अधिकारी  कर्मचारी,वार्ताहार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button