Uncategorized

गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल करा: मुखेड सकल मराठा समाजाची मागणी

मुखेड प्रतिनिधी:-
शनिवारी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा पार पडली. यानंतर सदावर्ते यांनी जरांगेंच्या सभेचा उल्लेख सभा नसून जत्रा असा केला होता. या वक्‍तव्येवर सखल मराठा समाजाचे भावना दुखवले गेले  यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मुखेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जानल्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा शनिवारी सभा झाली. याच सभेतून त्यांनी काही राजकीय नेत्यांवर टीका केली होती. सोबतच गुणरत्न सदावर्तेंवर देखील टीकेचे बाण सोडले होते. यानंतर जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना “जरांगे पाटील यांची सभा हे केवळ एका यात्रेच स्वरुप आहे. यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात”, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. या टीकेवरुन सखल मराठा समाजाचे भावना दुखवले गेले असून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुखेड येथील मराठा समजाच्या वतिने देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटला व आपल्या एकजुटीतून मराठा समाजाच्या वेदना दिसून आल्या आमच्या न्याय हक्का साठी ही सभा नियोजित केली होती परंतु, गुणरत्न सदावर्ते या व्यक्तीने या सभेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी ही सभा नसून जत्रा आहे. असं वक्तव्य केल्याने मराठा समाजात संतापाची लाठ पसरली असून जर सदावर्तेंवर तातडीने गुन्हा नोंद न झाल्यास रास्ता रोको  आंदोलन करण्याचा इशारा मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वाघ याना निवेदन मार्फत देण्यात आला या वेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्ते उपस्तीथ होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button