Uncategorized

मुखेड तहसील कार्यालयासमोर ८० वर्षीय वृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण

मुखेड-प्रतिनिधी १४ जानेवारी
मुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे वय ८० वर्षे या वयोवृद्ध महिलेचे मयत पती सखाराम मरीबा कांबळे यांच्या नावे असलेली मालकी हक्कात असलेली जागा गावातीलच काही लोकांनी पैश्याच्या जोरावर ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने गावातील इतर लोकांना हाताशी धरून बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत या प्रकरणी अन्यायकर्त्यांवर योग्य ती कारवाई करून मयत पतीची जागा परत मिळवून देण्यासाठी सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ पासून वयोवृद्ध श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व त्यांच्या सुनबाई लक्ष्मीबाई राजाराम कांबळे हे सतत तीन दिवसांपासून मुखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.
संबंधित प्लॉट धारक तथा मयत सखाराम मरीबा कांबळे यांची वयोवृद्ध पत्नी श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व दोन मुले हे आपली उपजीविका भागविण्यासाठी बाहेरगावी आपला उदरनिर्वाह करीत होते याचाच गैरफायदा घेऊन गावातीलच शिवाजी गोविंद एकाळे, परमेश्वर शिवाजी एकाळे व यादवराव गोविंद एकाळे यांनी उपोषणकर्ते व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन अनुसुचित जातीच्या या कुटुंबाची ज ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी व गावातील इतर लोकांना हाताशी धरून ग्रामपंचायत गावातला नोंद असलेली जमीन परस्पर हडप करण्याच्या उद्देशाने गेल्या २ वर्षांपासून याप्रकरणी संबंधित मयत सखाराम मरीबा कांबळे यांची कायदेशीर वारसात वैध असलेली ८० वर्षिय वयोवृध्द पत्नी श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वासरांचे हित लक्ष्यात घेऊन वयोवृद्ध महिलेच्या मागण्यांसंदर्भात न्याय, हक्कासाठी लढणारी मास संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नितीन यांच्यासह तालुका अध्यक्ष सुनील तोटरे यांच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या निवेदनानुसार वयोवृद्ध श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व त्यांच्या सुनबाई लक्ष्मीबाई राजाराम कांबळे हे सतत तीन दिवसांपासून योग्य न्यायाच्या मागणीसाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले असून या प्रकरणी लवकर न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाऐवजी आमरण उपोषण करण्यात येईल. उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा मास संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button