Uncategorized

मुखेड तहसीलदाराच्या लेखी अश्वासनाने वयोवृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण सुटले

मुखेड-प्रतिनिधी:- १६ जानेवारी
मुखेड तालुक्यातील मौजे खरबखंडगाव येथील मयत सखाराम मरीबा कांबळे यांच्या नावे मालकी हक्कात असलेली जागा गावातीलच काही लोकांनी पैश्याच्या जोरावर हडप करून बांधकाम करत असलेली जागा ताब्यात द्यावी या मागणीसाठी मयताची वयोवृद्ध पत्नी श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व त्यांच्या सूनबाई सौ. लक्ष्मीबाई राजाराम कांबळे यांनी सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ पासून बेमुदत उपोषणास उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दि.१४/०१/२०२६ रोजी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांच्या लेखी अश्वासनाने सदर ८० वर्षीय वृद्ध महिलेचे बेमुदत उपोषण सुटले.
संबंधित प्लॉट धारक तथा मयत सखाराम मरीबा कांबळे यांची वयोवृद्ध पत्नी श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे, दोन मुले व सुनबाई लक्ष्मीबाई राजाराम कांबळे हे आपली उपजीविका भागविण्यासाठी बाहेरगावी गेले असता याचाच गैरफायदा घेऊन गावातील शिवाजी गोविंद एकाळे, परमेश्वर शिवाजी एकाळे व यादवराव गोविंद एकाळे यांनी उपोषणकर्ते व त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देऊन अनुसुचित जातीच्या या कुटुंबाची ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी व गावातील इतर लोकांना हाताशी धरून गेल्या २ वर्षांपासून ग्रामपंचायत गावठाणला नोंद असलेली जमीन हडप करण्याच्या उद्देशाने सदर जागेवर बांधकाम चालू केले. याप्रकरणी मयत सखाराम मरीबा कांबळे यांची कायदेशीर वारस असलेली ८० वर्षीय वयोवृध्द पत्नी श्रीमती मरुबाई सखाराम कांबळे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या वासरांचे हित लक्ष्यात घेऊन वयोवृद्ध महिलेच्या मागण्यांसंदर्भात न्याय देण्यासाठी लढणाऱ्या मास संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या निवेदनानुसार सूरू करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश मिळले असून तहसीलदार राजेश जाधव यांनी दि.१४/१/२०२६ रोजी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यानंतर उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन वादग्रस्त जागेवर होत असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्यास सांगून सदर प्रकरणात सखोल कार्यवाही करून अहवाल सादर करण्याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना कळविण्यात आले. तहसीलदारांच्या या सकारात्मक लेखी अश्वासनाने उपोषणकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी महसूल सहाय्यक प्रशांत लिंबेकर यांच्यासह तहसीलचे सेवक जी. एम. पिंगळे, सेवक गौस शेख, खरबखंडगावचे चेअरमन गंगाधर पाटील, मास संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे, जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव, तालुकाध्यक्ष सुनिल तोटरे व संघटनेचे सदस्य विजय मोरे यांची उपस्थिती होती. याप्रकरणी अन्यायग्रस्तांना न्याय नाही मिळाल्यास मास संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन तलवारे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button