मुखेड तहसील कार्यालयात पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

▫️उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांनी दिल्या शुभेच्छा.
मुखेड प्रतिनिधी:-
दर्पण दिन व मकर संक्रांतीचे औचित्य साधून देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार मुखेड तहसील कार्यालयात दि. १६ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना शाल, पुष्पहार, डायरी, लेखणी व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

६ जानेवारी या दर्पण दिनाचे औचित्य साधून संबंध देशामध्ये फाकार दिन साजरा केला जातो त्याअनुषंगाने दि.१६ जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनी मुखेड शहर व परिसरातील फाकारांचा यथोचित सन्मानकरून गौरव केला. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार एस. एस. मामीलवाड, निवासीनायब तहसीलदार शालिनी धुळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, नांदेड जिल्हा मराठीपत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप कामशेट्टे, जिल्हा संघटक सुनिल पौळकर, मुखेड तालुका मराठी पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, असद बल्खी, बबल्ल मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार राजेश जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकारसंघाचे अध्यक्ष महेताब शेख यांनी केले. प्रशासनाच्या वतीने उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार शालिनी धुळे यांनी मानले.

याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड व सचिव राजेश बंडे यांनी दर्पण दिनानिमित्त आपल्या मनोगतातुन पत्रकारितेचे महत्व व व्यथा व्यक्त केल्या. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटकएस. एस. हुड्डें, तालुकाध्यक्ष परमेश्वर वारे, सचिव यु.पी. सुभेदार, तलाठी संघटनेचे सचिव सतिश देशमुख, सहाय्यक महसुल अधिकारी मोईन शेख रुपेश मुधोळकर, महसूल सहाय्यक प्रशांत लिखेंकर, के. व्ही. महाडीवाले, संगिता वाडीकर, कमलावती कल्लेपवार, अनुराधा चिनसबवार, गंगागीर गिरी, दफेदारजि.एम. पिंगळे, गोविंद भास्करे, गौस शेख, राजेश जाधव, माधव गायकवाड, शरद नरबागे, संदीप गायकवाड, श्रीकांत श्रीरामे, रविना लुगारे, धम्मशिल्ला हणमंते यांच्यासह सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव व तहसिल कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.



