Uncategorized

नांदेडमध्ये सुनेनेच केला सासूचा खून; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

नांदेड प्रतिनिधी:- २८ जानेवारी २६

नांदेडजिल्ह्यातील हदगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहेअनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळाआवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेयाप्रकरणी पोलिसांनी मयत महिलेची सूनतिचा प्रियकर आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहेकमलाबाई क्षीरसागर (वय ५४असे मयत महिलेचे नाव आहे.

नेमकी घटना कायपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसारकमलाबाई क्षीरसागर या हदगाव तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होत्याकाही महिन्यांपूर्वीच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होतेत्यानंतर त्या आपली विधवा सून सुनीता(वय ३५आणि नातवासोबत राहत होत्यामात्रसून सुनीताचे तिच्यापेक्षा वयाने  वर्षे लहान असलेल्या परमेश्वर वानखेडे (वय २६या तरुणासोबत प्रेमसंबंध होतेपतीच्या निधनानंतर हे संबंध अधिकच वाढलेहोते.

असा रचला हत्येचा कट कमलाबाई यांना सुनेच्या या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती आणित्यास त्यांचा सक्त विरोध होतायावरून सासूसुनेमध्ये वारंवार खटके उडत होतेआपल्या प्रेमात सासू अडथळा ठरत असल्याच्या रागातून सुनीताने प्रियकर परमेश्वर सोबत मिळून सासूचा काटा काढण्याचे ठरवले१० जानेवारीच्या रात्री कमलाबाई गाढ झोपेत असतानासुनीता आणि परमेश्वरने स्कार्फने गळाआवळून त्यांची हत्या केली.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी सुनीताने आपला भाऊ अमोल इटकरेआणि नातेवाईक अक्षय कदम यांची मदत घेतलीत्यांनी मृतदेह एका पोत्यात भरून दुचाकीवरून नेलाआणि वाळकी फाटा येथील पैनगंगा नदीपात्रात फेकून दिलासुरुवातीला सासू बेपत्ता असल्याची तक्रारनातवाने दिली होतीपरंतु नदीपात्रात मृतदेह सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी लावला छडा हदगाव पोलिसांनी तांत्रिक तपासमोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने फिरवलायात मयत महिलेची सून आणि तिच्या प्रियकराच्या हालचालीसंशयास्पद आढळल्यापोलिसांनी खाक्या दाखवताच सुनेने गुन्ह्याची कबुली दिलीया प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button