राजकीय

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारदि२८ जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालंत्यांच्या जाण्याने पक्ष आणि सरकारमधील त्यांची जागा रिक्तझाली.

ती जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहेत्यांनी राजभवनातील लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीत्यानंतर सायंकाळी  वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीराज्यपाल आचार्य देवव्रत यांनीत्यांना शपथ दिलीयावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.

तसेच सरकारमधील अनेक मंत्रीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेप्रफुल्ल पटेलराष्ट्रादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारीभाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होतीकुठलाही गाजावाजा  करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहेमात्र खातेवाटप पुढीलकाळात होणार असून सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जातेहे लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यानशनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंहोतंहा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहेआपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणालेहोतेत्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलंगेलंमात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते.

दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतलीएकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button