मुखेडात शिष्यवृत्ती परीक्षेत ‘सावळा गोंधळ’; मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तर इंग्रजीच्यांना मराठीचे पेपर!

मुखेड (प्रतिनिधी): २३ फेब्रुवारी २६
दि २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुखेड येथील परीक्षा केंद्रावरप्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे, तरइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे पेपर वाटप झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्यांच्या माध्यमाचे पेपर मिळालेले नाहीत. मराठीमाध्यमाच्या वर्गात इंग्रजीचे पेपर गेले, तर सेमी–इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. ही चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता.
१५ मिनिटे उशिरा मिळाले पेपर हा गोंधळ निस्तरताना आणि योग्य प्रश्नपत्रिकांची जुळवाजुळव करताना परीक्षेच्या वेळेतील तब्बल १५ मिनिटे वाया गेली. यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या लहान विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले परीक्षा केंद्राबाहेर थांबलेल्या पालकांना जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी शाळेच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर गर्दी करत प्रशासनाचा निषेध केला. “प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या मुलांचे शैक्षणिकनुकसान होत आहे. जो १५ मिनिटांचा वेळ वाया गेला आहे, तो विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात यावा,” अशी आग्रही मागणी पालकांनी केंद्र संचालकांकडे केल्या ही परीक्षा संपल्यानंतर पालक व परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची एकमेकासी संवाद साधून पालकाचा गैरसमजनेतुन ही तक्रार झाल्याचे लेखीपत्र पालकांनी दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला
मुखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची येथे अकरा खोल्यात इयत्ता आठवी शिक्षणघेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती या परीक्षेसाठी इंग्लिश माध्यम, सेमी माध्यम वमराठी माध्यमचे विद्यार्थी असून ही परीक्षा पूर्ण नियोजित असूनही परीक्षा प्रमुख, केंद्र संचालक यांच्या निष्काजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे हा गोंधळ उडाला असल्याचे पालकातून लेखी पत्र देणे अगोदरबोलले जात होते.



