सावधान! दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार केल्यास होणार जेल; नांदेड जिल्ह्यात ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा’ लागू

नांदेड प्रतिनिधी:- २३ फेब्रुवारी २६
जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा केंद्रांवर पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन अधिक कडक झाले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सचिव यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, सर्व परीक्षा केंद्रांवर ‘महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंध कायदा १९८२’ लागू करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
महत्त्वाचे पेपर आणि खबरदारी येत्या २५ फेब्रुवारी रोजी १२ वीचा जीवशास्त्र आणि २७ फेब्रुवारी रोजी १० वीचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. या महत्त्वपूर्ण पेपर्ससह उद्यापासून होणाऱ्या सर्वच विषयांच्या परीक्षेसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
कायद्यातील प्रमुख तरतुदी आणि शिक्षा या कायद्यानुसार केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षक, कर्मचारी आणि संस्थाचालकही कारवाईच्या कक्षेत येणार आहेत.
परीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असून, कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमांचे पालन करावे आणि परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



