क्राईम

शेतीच्या नावाखाली काळा धंदा; मुखेड तालुक्यात ५ किलो गांजासह शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात!

मुखेड प्रतिनिधी: श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६

मुखेड तालुक्यातील हिप्परगा (देशिवारात एका शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेनांदेडच्या स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाने या शेतावर छापा टाकून तब्बल ५ किलो १९० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्तकेली आहेतयाप्रकरणी संशयित आरोपी शेतकरी गोविंद केरबा शिकारे याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असूनया कारवाईमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या धडक कारवाईची सविस्तर माहिती अशी कीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे यांना एका विश्वसनीय खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली होतीहिप्परगा (देयेथीलशेतकरी गोविंद शिकारे याने स्वतःच्या शेतात चोरट्या मार्गाने गांजाची लागवड केली असूनतो त्याची विक्री करण्याच्या तयारीत आहेमाहिती मिळताच उपनिरीक्षक दासरे यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली.

वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळताचस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिप्परगा (देशिवारातील संबंधित शेतात छापा टाकलापोलीस पथक शेतात पोहोचताच त्यांना तिथे गांजाची हिरवीगार झाडे डोलताना आढळलीपोलिसांनी चकित करत तात्काळ शासकीय पंचांसमक्ष घटनास्थळाचा रितसर पंचनामा केलाया छाप्यात १ लाख ३ हजार ८०० रुपये किमतीचा एकूण  किलो १९० ग्रॅम गांजा जप्तकरण्यात आला आहे.

सदरील धडक कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमारअपर पोलीस अधीक्षक सूरज गुरवयांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आलीयामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसलेपोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाडपोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरेपोलीस अंमलदारमाधव केंद्रे, देवीदास चव्हाण, दिलीपकुमार चंचलवार, रितेश कुलथे, मोतीराम पवार आणि सुधाकर देवकते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पुढील तपास मुखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button