वाहतूक निरीक्षकास मारहाण दोघाजनावर ऍट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल

नांदेड प्रतिनिधी:-
शहरांमध्ये असलेल्या आसना बायपास जवळ मोटार वाहतूक निरीक्षक चव्हाण व यादव हे आपले काम करत असताना दोघाजणांनी फोन करून आम्हाला तुम्हाला भेटायचे म्हणून बोलून घेऊन जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली असून फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघा जनावर ऍट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे
सविस्तर वृत्त असे की प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोन मोटार वाहतूक निरीक्षक हे आपले कामकाज करत असताना ड्रायव्हिंग शाळेच्या अहवालाबाबत या दोघांनी वाद घालून मोटार वाहतूक निरीक्षक चव्हाण व यादव यांना जातीवाचक शिवीगाळ करून महान केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस स्टेशन मध्ये गजानन गिरी व साजीद मुनवर अली या दोघा विरुद्ध विमानतळ पोलिस स्टेशनमद्ये ॲट्रॉसिटीॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव हे करीत आहेत



