शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा :- हणमंतराव नारनाळीकर

मुखेड प्रतिनिधी:-
शहरात वीज पुरवठा सतत खंडीत होण्याचा प्रकार गेल्या 2 ते 3 वर्षापासून सुरु आहे त्यामुळे व्यावसायिकांना सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी महावितरण – कार्यालयास वेळोवेळी शेकडो निवेदने दिली व निवेदनाच्या अनेक वर्तमानपत्रांतून बातम्याही प्रकाशित झाल्या पण या बाबींचा संबंधित कार्यालयावर कसलाच फरक पडला नाही. महावितरण – कार्यालयाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे शहराला व शहारतील नागरिकांच्या – घरी विद्युत पुरवठा सुरुळीत होत नाही ग्राहकांची गैरसोय होत आहे या सर्व भागामध्ये सतत खंडीत होत असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. विद्युत पुरवठा सुरळीत नाही झाल्यास शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष हणमंतराव नारनाळीकर यांनी दिला आहे.
याबाबत महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मुखेड यांनी स्वतः गांभीयार्ने नोंद घेऊन मुखेड शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी टाऊन एक व दोनमधील महत्त्वाच्या ठिकाणी ए.बी. स्वीच बसविण्याची कार्यवाही करावी अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला



