सामाजिक

मुखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; रेबीजने एका रुग्णाचा बळी!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज ०१ एप्रिल २६

मुखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असूनकुत्र्यांच्या चाव्यामुळेरेबीज (Rabies) सारख्या जीवघेण्या आजाराने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहेया गंभीर प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले असूनप्रशासनाने तात्काळपावले उचलण्याची मागणी भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) मुखेड शाखेने केली आहे.

आयएमएने मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीशहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेमागील आठवड्यात एका रेबीज झालेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहेडॉक्टरांच्या संघटनेने थेट पत्राद्वारे ही माहिती दिल्याने परिस्थिती किती गंभीर आहेहे स्पष्ट होत आहे.

रस्त्यारस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या वावरत असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहेविशेषतः शाळेत जाणारी मुले आणि पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या वृद्धांच्या जीवाला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहेरेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत बंदोबस्त  झाल्यास अजून बळीजाण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नगर परिषदेने तातडीने नियमाप्रमाणे याभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावाअशी आग्रही मागणी ‘आयएमए‘ मुखेडचे अध्यक्ष डॉअशोक कौरवारसचिव डॉकैलास पाटील ,डॉ रामराव श्रीरामे,डॉ पत्की आणि युवा उद्योजक कृष्णा देबडवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button