Uncategorized

स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर खंडेराय तर ग्रामीण पोलीस स्टेशनला जगदीश भंडारवार

नांदेड प्रतिनिधी:-

गुन्हेगाराची गर्दन काळ ठरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी उदय खंडेरायांची नियुक्ती केली असून त्या पदावर असलेले नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी पदभार घेतलेले जगदीश भंडरवार यांना ग्रामीण पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहे
पंधरा दिवसांपूर्वीच या खुर्चीवर साडेतीन वर्ष कार्यकाळ गाजवणारे द्वारकादास चिखलीकर हे नुकतेच वयामानानुसार 31 ऑक्टोंबर रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी सहा महिन्यापूर्वी आदेश काढलेले वजीराबाद येथील कार्यरत जगदीश भंडारवार यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती सहा महिन्यापूर्वी केली होती परंतु पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मॅटमध्ये या बदली आदेशाला स्थगिती मिळवली व सहा महिने त्या खुर्चीवरच थांबून राहिले सेवानिवृत्त झाल्यानंतर ही खुर्ची रिकामी झाली . पूर्वीच्या आदेशानुसार जगदीश भंडारवार यांनी त्या खुर्चीवर विराजमान झाले परंतु राजकीय पुढार्‍यांनी मंत्रालयामध्ये खलबत्ते केल्यामुळे नाईलाजाने जगदीश भंडारवार यांना ही खुर्ची सोडावी लागली या खुर्चीवर नवीन पोलीस निरीक्षक उदय खंडेरायांची नियुक्ती केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button