मुखेड येथे आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

मुखेड येथे १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहुजी साळवे चौकात आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची २२९ वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कालखंडातील इतिहास पाहिला तर खूप मोठी ऐतिहासिक क्रांती त्या कालखंडात त्यांनी घडवली. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण व भरीव योगदान देणाऱ्या देशासाठी वाहून घेणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव २२९ वर्षांनंतर आजही युवकांच्या हृदयात आहे,
या कार्यक्रमात प्रथम लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे व नाम फलकाचे पूजन मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे, संचालक मा.नागनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड, काँग्रेस कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड, बलभीम शेंडगे ,पत्रकार मुजीफ शेख, पत्रकार मिलिंद कांबळे ,विश्वनाथ गायकवाड ,बालाजीराव गायकवाड ,तेजराव गायकवाड ,बापूराव गायकवाड, गौरव जाधव ,खंडू गायकवाड ,व्यंकटेश जाधव ,नितीन गायकवाड ,अरुण गायकवाड ,आणि बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.



