Uncategorized

निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आधारकार्ड,पासबुक,मोबाईल क्रमांक सादर करावे – जाधव.

मुखेड / प्रतिनिधी.

मुखेड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेच्या पात्र  लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणी चालू असलेले मोबाईल क्रमांक यापूवी सादर केले नाही त्यांनी संलग्न करण्यासाठी तहसिल कार्यालय मुखेड येथे सादर करावा.सप्टेंबरपासून महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.त्याशिवाय सप्टेंबरचे अनुदान मिळणार नाही.यासंदर्भात शासनाचे सक्त निर्देश आहेत त्यामुळे निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रासह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव व नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर पासुन महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे.त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि चालु मोबाईल क्रमांक संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालय येथे १३ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत.सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर पासून महाडीबीटीद्वारे शासन स्तरावरुन थेट खात्यात जमा होणार आहे.सदर माहिती सादर केली नाही तर १५ सप्टेंबरपासून लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.त्यामुळे याबाबतीत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र १३ स्पटेंबर पर्यंत तहसिल कार्यालय मुखेड येथे सादर करावेत असे आवाहन तहसीलदार राजेश जाधव,नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button