Uncategorized
भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

मुंबई:-
निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यातएकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणीहोऊन निकाल जाहीर करण्यात येईल.
महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. यातच आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यातआली आहे. पुण्यातून कोथरूड विधानसभेतून पुन्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीआहे.
भाजपची विधानसभा उमदेवारांची पहिली यादीखालीलप्रमाणे
- नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
- कोथरूड – चंद्रकांत पाटील
- शहादा – राजेश उदेसिंग पाडवी
- नंदुरबार – डॉ. विजयकुमार गावित
- धुळे शहर – ओमप्रकाश अग्रवाल
- धुळे ग्रामीण – डॉ. सुभाष भामरे
- सिंदखेडा– जयकुमार रावल
- रावेर – हरिभाऊ जावळे
- भुसावळ (SC) – संजय सावकारे
- जळगाव शहर – सुरेश (राजुमामा) भोळे



