Uncategorized

रानडुकराच्या भ्याड हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड तालुक्यातील लोभा तांडा कोडग्याळ शेतकरी शेतात खरिप हंगामातिल मशागतिचे काम करित असताना अचानक पणे सुसाट वेगाने सुटलेल्या रानडुकराने धडक देऊन गंभीर जखमी केले.

या हल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतक-यास उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.ही घटना दि.२४ रोज गुरूवारी संग्राम माधवराव पाटील यांच्या शेतात दुपारच्या सुमारास घडली.रानडुकराच्या भ्याड हल्यात गंभीर जखमी झालेल्या घटनेमुळे भितिचे वातावरन पसरले आहे.
मोकाट जनावरांचा
वन विभाग खात्याने बंदोबस्त करावा अशी मागनी शेतक-यांनी केली आहे.

या बाबत सविस्तर असे की,मुखेड तालुक्यातील लोभातांडा कोडग्याळ येथील शेतकरी उमाकांत गोविंद राठोड वय ३७ वर्ष हा नियमित पणे संग्राम पाटील लोभातांडा यांच्या शेतात मशागतिचे काम करत असताना अचानक पणे सुसाट वेगाने आलेल्या रानडुकराने जोराचा हल्ला केला. या हल्यात गंभीर जखमी झालेला उमाकांत राठोड यास उपजिल्हा रुग्नालयात प्राथमिक उपचार करुन नांदेड येथे हलवण्यात आले असुन प्रकर्ती गंभीर असल्याचे माहिती मिळाली आहे.
मुखेड तालुक्यात मागील काही दिवसा पासून मोकाट हिस्ञ प्राण्यांचा सुळसुळाट झाला आहे.यात रानडुकरे,कोल्हे,
वानर, माकडे, मोर, लांडगे यांनी उत्साद मांडले आहे.तालुक्यात सध्या रब्बी हंगामाची पेरनी व पेरनी पूर्वी मशागतिचे कामे चालु असुन हिस्ञ प्राण्यांच्या शेतात वावर वाडटल्यामुळे शेतक-यात भितिचे वातावरन निर्माण झाली आहे.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करुन रानडुकराच्या हल्यात जखमी झालेल्या शेतक-यास तात्काळ मदत द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button