मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी २४ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र वैध व ७ नामनिर्देशनपत्रे अवैध
मुखेड प्रतिनिधी:-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार ९१ मुखेड कंधार विधानसभा मतदार संघासाठी दि. २४ ते २९ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीतकालावधीत २४ उमेदवारांची एकूण ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. पैकी छाननी मध्ये एकूण ७ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहेत. १७ उमेदवारांचे वैद्य नामनिर्देशन पत्र २८ एवढे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया ९१ – मुखेड कंधार मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कक्षा मध्ये दि. ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता सुरु केली.
या छाननीमध्ये (१) दशरथ मंगाजी लोहबंदे (२) यादव बलिराम कांबळे (३) सचिन गोवर्धन चव्हाण (४) प्रदिप धर्माजी इंगोले (५) खंडेराव हैबतराव हसनाळकर (६)मस्तान पाशुमियाँ पिंजारी (७) हरिदास संतुकादिंडे यांचे आहेत अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली.
एकूण २४ उमेदवारांनी ३५ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननी अंती २४ उमेदवारांची १७ नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली व ७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आली. सर्वनामनिर्देशपत्रांची छाननी करुन त्यावर निर्णय घेण्यात आला. छाननी मध्ये वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) पाटील हाणमंतराव व्यंकटराव २) तुषार गोविंदराव राठोड ३) गोविंद दादाराव डूमणे ४) श्रीहरी राजाराम बुडगेमवार ५) बालाजी नामदेव खतगावकर ६) रुक्मीनबाई शंकरराव गीत्ते ७) परसरामदत्ता कदम ८) संतोष भगवान राठोड ९) रावसाहेब दिगांबरराव पाटील १०) प्रकाश चांदोबा गवलवाड ११) कल्पना संजय गायकवाड १२) शिवाजी नागोराव जाधव १३) राहूल राजू नावंदे १४) अहिल्याबाई हाणमंत मामीलवाड १५) देवानंद तुलजीराम देशमुख १६) विजयकुमार भगवानराव पेठकर १७) सतिश लक्ष्मणराव कावडे हे वैध ठरले आहे
आज दिनांक 30/10/2024 रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. रण विजय यादव यांनी 91 मुखेडविधानसभा मतदार संघातील निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयास भेट देवून निवडणूक विषयककामकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेश जाधव, तानाजी चव्हाण, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सतिश जोहरे, निवडणुक विभागाचे लिपीक प्रशांत लिंबेकर, नायब तहसीलदार पी.डी. गंगनर, शंकर कुसुमकर, एन.एस. होनराव, मिडीया कक्षाचे प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजययेनुरवार,रफिक बागवान इ. उपस्थित होते.