विद्यार्थ्यांची लूट आणि टी.सी. अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा!

▫️’एसएफआय‘ (SFI) नांदेड जिल्हा कमिटीचे समाज कल्याण विभागाला निवेदन!
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६
नाव नोंदणी आणि पुढील प्रवेशाचा काळ सुरू असतानाच, जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली जात आहे. दरवर्षी समाज कल्याण विभागा मार्फत मिळणारी शिष्यवृत्ती वेळेवर जमा न झाल्याचे कारण पुढे करत, अनेक महाविद्यालये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची टी.सी. (दाखला) रोखून धरत आहेत. ‘पूर्ण कॉलेज फी भरल्याशिवाय टी.सी. मिळणार नाही‘ अशी बेकायदेशीर भूमिका घेत विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, तसेच टी.सी. देण्यासाठी बेकायदेशीर पैशांची ( अतिरिक्त शुल्क) उघडपणे मागणी होत आहे. यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचेपुढील शिक्षण धोक्यात आले आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत आज स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीनेमा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या:
१) शिष्यवृत्ती जमा झाली नाही या कारणास्तव विद्यार्थ्यांची टी.सी. रोखून धरणाऱ्या महाविद्यालयांवरतात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
२) टी.सी. साठी नियमबाह्य पैशांची मागणी करणाऱ्या शाळा–महाविद्यालयांची सखोल चौकशी व्हावी.
३) कोणत्याही विद्यार्थ्याची अडवणूक होऊ नये यासाठी समाज कल्याण कार्यालयातून तात्काळ कडकपरिपत्रक जारी करण्यात यावे.
जर प्रशासनाने यावर त्वरित पावले उचलली नाहीत, तर SFI नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने समाजकल्याण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी एसएफआयचे जिल्हा सहसचिव कॉ. पवन जगडमवार, मनिषा थोरात, सूरज जीमेकर, सूरजकांबळे, शितल आंबेकर, दिव्या भिसे यांच्यासह इतर विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.



