नजीर शेख युजीसी नेट उत्तीर्ण

नांदेड/प्रतिनिधी:-
सामाजिक कार्यकर्ते व लेखक शेख नजीर यांनी युजीसी नेट परीक्षा पास केली. यापुर्वीच महाराष्ट्र सेट पासकेले. त्यांनी सेट व नेट इतिहासात पास केले. श्री शेख हे देळूब बु. गावचे असून आई–वडील नसल्याने कष्टकरीत शिक्षण घेतले. अथक परिश्रमामातून यश संपादन केले.
आई नंतर मोठी बहिणीने त्यांचे पालन पोषण केले. मावशीच्या घरी राहून ते शिकत होते. शेख यांचेप्राथमिक शिक्षण देळूब गावी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राजाबाई हायस्कूल पार्डी येथे झाले. बी.ए. अर्धापूर तर एम. ए. नांदेड शहरात झाले. सातवी ते बारावी शिक्षणासाठी चार किलोमीटर पायी तरबी.ए. साठी दहा किलोमीटर सायकलीवर जाऊन शिक्षण घेतले. वडिलांचे छत्र बालपणी हरवले व काहीवर्षांतच आई गेली. पुढे ते नांदेडला मावशी व बहिणीच्या घरी राहून अभ्यास करू लागले. लहानपणी आईसोबत ते शेतात मजुरीला जात पुढे शेळी पालन करत शिक्षणही घेतले. सेट नेट दोन्ही पास झाल्यानेमहाराष्ट्रातील थोरामोठ्यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या यशात बहिण, मावशी, गुरूजनात प्रा. साईनाथ, जगदीश कदम, अल्ताफ हुसेन, मित्र लक्ष्मण कदम, फारूख अहमद आदींचे मार्गदर्शन व योगदान आहे.



