मुखेड मध्ये पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट; आमदारांच्या गाडीला काळे झेंडे

मुखेड तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर करून ट्रिगर-1 च्या सवलती लागू करा – राजमुद्रा संघाची आक्रमक मागणी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १० ऑक्टोंबर २६
मुखेड येथे आज पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी आलेले विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे व मुखेडचे आमदार तुषार राठोड यांच्या ताफ्याला राजमुद्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध केला.
मुखेड तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शासनाने मुखेडला ट्रिगर-1 मधून वगळले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर पीक जळून खाक झाले आहे. शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या प्रचारापुरते मुखेडमध्ये येतात, असा संताप व्यक्त करत राजमुद्रा संघाच्या कार्यकर्त्यांनी “मुखेड तालुका दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ट्रिगर-1 लागू झालाच पाहिजे” अशा जोरदार घोषणा दिल्या.

आमदारांच्या गाड्या अडवून राजमुद्रा संघाने निवेदनही दिले. जोपर्यंत मुखेड तालुक्याला ट्रिगर-1 नुसार 25% पीक विमा अग्रीम, वीज बिल माफी, आणि सर्व सवलती मिळत नाहीत तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला मुखेडमध्ये फिरू देणार नाही, असा सज्जड इशारा राजमुद्रा संघाने दिला आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राजमुद्रा संघाचे अध्यक्ष सचिन पाटील इंगोले, शिप्रसाद पाटील तेलंग बालाजी पाटील वडजे, अशोक बच्चेवार, गिरीधर पाटील करूरकर, संजू पाटील लादगेकर. प्रमोद पाटील वडजे, माधव हुगेवाड, एम.आर गोपनर, विरभद्र स्वामी, राजू वाघमारे, गणेश पाटील जुनने, वैभव इंगळे, साई इंगोले, सोनू गायकवाड, दीपक पाटील जुन्ने, सुनील भाऊ, सोहम भिसे, देवराव पवार ,कपिल काटेवाड, विश्वजित इंगोले, यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.





