शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी तर आमदार शहाजी बापू यांचा पराभव
सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगोला मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतीलबंडखोरीत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला
शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. आबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनीविजयी झाले आहेत.
माझ्यासोबत आलेल्या 50 आमदारांपैकी एकजरी पडला तर, मी गावाकडे शेती जाऊन शेती करेन, असेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले होते. पण गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांपैकी शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचाबालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून 11 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खुद्दशहाजीबापुंनी देशमुखांविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावालागला होता.
2019 ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेशहाजीबापू पाटील यांना संधी चालून आली होती. 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटलांचा विजय झालाहोता. यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत शहाजी बापू पाटीलयांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघखेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.