मुखेड येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा जिल्हा समितीचे चौथे अधिवेशन उत्साहात पार पडले

मुखेड प्रतिनिधी:- ७ ऑगस्ट २५
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे नांदेड जिल्हा समितीचे चौथे जिल्हा अधिवेशन मुखेड येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात सवार्नुमते महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. शेतमजुर, कामगारव मजुरांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच १३ सदस्यीय जिल्हा समितीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ. अंकुश अंबुलगेकर यांची तर जिल्हा सचिवपदी कॉ. मंजुश्री कबाडे यांची पुनर्निवड करण्यात आली.

मुखेड येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाच्या नांदेड जिल्हा अधिवेशनाच्या मंचास कॉ. सुभाष थोरात यांचे तर सभागृहास कॉ. उत्तम पुंडगे यांचे नाव देण्यात आले. लाल बावटाचे जिल्हाध्यक्ष कॉ. अंकुश अंबुलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात करण्यातआली. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हासचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन शेतमजुर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे यांनी केले याप्रसंगी राज्यसमिती सदस्य कॉ. भगवानकोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉ. अंकुश अंबुलगेकर, कॉ. रुक्मिनताई घुळेकर, कॉ. शहादत धुंदीयांच्या अध्यक्ष मंडळाने अधिवेशनाचे कामकाज पाहिले. स्टीअरिंग कमिटीमध्ये कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. मंजुश्री कबाडे हे होते. कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड यांची मिनिट्स कमिटी होती. अधिवेशनात जिल्हा सचिव कॉ. मंजुश्री कबाडे यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय, संघटनात्मक वकार्यात्मक अहवाल मांडला व तो सर्वांसमोर पारित झाला. अधिवेशनात खालील महत्वाचे ठराव पारितकरण्यात आले यामध्ये गायरान जमीन, वन जमीन व इतर जमिनीवरील कसण्मैया दलित, आदिवासीतसेच इतर भुमीहीनांच्या नावे जमीन झाली पाहिजे आणी बेघरांना घरे बांधण्यासाठी प्लॉट मिळाले पाहिजे करिता संघर्ष उभारणे, युनियनचे अस्तित्व असलेल्या प्रत्येक गावात मनरेगा अंतर्गत रोहयोचे कामसुरू करणे व इतर गावांमध्ये त्या आधारे युनियनचा विस्तार करणे, महिला, दलित व आदिवासीयांच्यासोबतच्या भेदाभेद व इतर स्वरूपाच्या अत्याचाराविरु द्ध लढणे, शेतमजुरांच्या बरोबरीने इतरग्रामीण मजुरांना युनियनच्या झेंड्याखाली संघटित करणे, बांधकाम कामगार व ऊसतोड कामगारांमध्ये विशेषत्वाने युनियन मजबूत करणे या ठरावाच्या आधारे पुढील काळात शेतमजूर व ग्रामीण मजुरांचासंघर्ष तीव्र करण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला. जिल्हा अधिवेशनात १३ सदस्यांची जिल्हासमिती निवडण्यात आली. राज्यधिवेशनासाठी एकूण १५ प्रतिनिधी व ०५ निरीक्षक निवडण्यात आले.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. अकबर सय्यद, मुखेड तालुका सचिव कॉ. शहादत धुंदी, कॉ. प्रदीप देशटवाड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रामराव यामावाड, कॉ. अंबादास कांबळे, कॉ. रेणुका तुरेवाड यांच्यासह महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटाचे पदाधिकारी वकॉम्रेड यांनी परिश्रम



